शक्तिरूपेणः संस्थिता
====================
दुसरी माळ----शैला संधू
अरूणा असफअल्ली यांनी वाडःमयीन प्रकाशन करण्याकरिता जी ' राजकमल प्रकाशन संस्था ' स्थापन केली होती. ती कंपनी मोठ्या संकटात सापडली होती. हरदेव माझा नवरा त्याने जी " निर्यात कंपनी " स्थापन केली होती. ती आता फार मोठी व्यापार करणारी संस्था बनली होती. हरदेवचे नशीब फळफळले होते. त्याने जिथे हात लावला तिथे त्याला यश मिळत गेले म्हणून त्याने मला काही माहिती होण्याच्या अगोदरच अरूणा असफअलीकडून राजकमल प्रकाशनचे बहुतांशी शेअर्स विकत घेतले. परंतु त्याचे लवकरच राजकमल प्रकाशनचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्याशी गंभीर मतभेद उद्भवले म्हणून हरदेव ने डबघाईस आलेली प्रकाशन संस्था माझ्या नावे विकत घेतली. आता मला बोर्ड बैठकीला उपस्थित राहावेच लागे. मी मुळची पंजाबी होते. त्यामुळे मला हिंदी येत नव्हते. मग ब-याच समस्या निर्माण व्हायला लागल्या.
त्यामुळे मी आता हिंदीतल्या लघुकथा वाचायला सुरूवात केली. मला वाचता वाचता लक्षात येऊ लागलं की हिंदी साहित्य हे गुंतागुंतीचे आहे. पण मला " नई कथाए" या कथासंग्रहाने हिंदी सोबत मैत्री करण्यास भाग पाडले. पण एवढं पुरेसं नव्हतं. परंतु त्या वेळेस मला काही लेखक असे भेटले की त्यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद स्वरूप हात ठेवला. माझे हिंदी आणि हिंदी साहित्या विषयीचे अज्ञान दूर केले. हे ऋण मला कधीही फेडता येणार नव्हते. " पीपल्स पब्लिशिंग हाऊस " मधील माझे काही मित्र ,लेखक , उर्दू -हिंदी कवी यांनी माझे धैर्य कायम ठेवले. या काळात राजकमलचा जो तरूण सल्लागार होता त्याने मला साहित्यक्षेत्रात बुद्धिनिष्ठ लेखांचे वैयक्तिक राजकारण , त्यांचा परिचय , साहित्यक्षेत्रातील निरनिराळे गट याचाही परिचय करून दिला. मी माझ्या परीने प्रयत्न करत होते. पण काही लोक म्हणत होते की , राजकमल प्रकाशन संस्था लवकरच बंद पडणार आहे. मी ह्या सर्व टिकेकडे कानाडोळा केला , माझे डोळे मी उघडे ठेवले आणि मला जे येते , जे येत नाही त्यावर लक्ष केंद्रित केले. मी सर्व कार्यंयत्रणा व्यवस्थित केली, उत्पादनाला शिस्त लावली आणि जे लेखक मला प्रतिकूल नव्हते त्यांना भेटण्याला मी प्रारंभ केला. राजकमल आपली सर्व पुस्तके आणि ग्रंथ नवीन छापखान्यात छापीत असे. तो छापखाना आमच्याच मालकीचा होता. त्या छापखान्यात मजूर विरूद्ध मालक संघर्ष निर्माण झाला. त्यात माझ्याविरूद्ध माझ्या घरासमोर निदर्शने करण्यात आली. मला संकटांनी चोहोबाजूंनी घेरून टाकले. पण मी माझे कार्य प्रामाणिकपणे चालू ठेवले. या दरम्यान मी अनेक मान्यवर लेखकांना भेटले. त्यांना राजकमल प्रकाशन संस्थेबाबत आश्वस्थ केले. माझ्या आता अनेक लेखक , कवी यांच्या ओळखी झाल्या. माझ्या वयाचे जे लेखक , कवी होते त्यांच्यात प्रकाशन संस्थेविषयी हळूहळू विश्वास निर्माण करत गेले. त्यांच्यातून बरेच लेखक , कवी माझे मित्र बनत गेले. या सर्व लेखक , कवी मित्रांच्या सोबतीने मी "राजकमल प्रकाशन संस्था " हळूहळू उत्तम स्थितीत आणत गेले.
हिंदी साहित्यात माझे योगदान कोणते ? तर हिंदी साहित्याला मी " राजकमलची " श्रेष्ठ परंपरा पूर्वरत करून तिला उत्कृष्ट वाडःमय कृतीची भेट अपर्ण केली. राजकमल बरोबर घालविलेली तीस वर्षे मी कधीही विसरणे शक्य नव्हते. या प्रवासात माझे जीवन अनुभवसंपन्न झाले. पंजाबी भाषा अवगत असणारी मी एक स्त्री हिंदी साहित्याच्या प्रांतात शिरली. त्यामुळे माझे व्यक्तिमत्व उजळून निघाले आणि राजकमल प्रकाशन संस्थेत योगदान देता आले. त्या काळी मी हिंदी प्रकाशन विश्वात प्रकाशन संस्थेची उत्तमरित्या जबाबदारी सांभाळणारी पहिली महिला ठरले होते.
©वर्षा पतके थोटे
8/10/2021
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा