मराठी साहित्यिक पान ( वेगवेगळे विषय- वेगवेगळे आशय )
गुरुवार, ६ एप्रिल, २०२३
कविता
प्राजक्त
हळव्या आठवणी , हळवी कहाणी
तुज आठवताना , डोळाभर येते पाणी
सांगताना सुखावते , आठवणींचा गलका
तुझ्या माझ्या भेटीचा , तो क्षण निराळा
किती आठवावे , किती पुसावे कोणा
का हरवला असेल , माझाच कान्हा
सहजची भेटणे नसावे , आपुले ते सख्या
का विसरलास तू, आपल्यातील अनुबंधा
असा कसा तू निराळा , माझ्या भाळी आला
ओढ लावूनी गेलास , मी कवटाळले प्राजक्ता
मंद मंद सुवास तो , भिनतो माझ्या श्वासात
तू जवळी असल्याचा भास , हाच आनंद आता मनात
©वर्षा पतके थोटे
©वर्षा पतके थोटे
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>



