संक्रमण काळ
==================
स्त्री असणे मुळातच एक सुंदर गोष्ट आहे . पण वयाच्या मध्यावर आल्यावर तिच्यामध्ये जे प्रचंड प्रमाणात शारीरिक आणि मानसिक बदल होतात ते बिलकुल सहजपणे घेण्यासारखे नसतात . खरं म्हणजे स्त्री चे ऋतुचक्र ही एक नैसर्गिक अतिशय सुंदर गोष्ट आहे . महिन्यातल्या त्या चार - पाच दिवसात स्त्री ऋतुमती होते तेंव्हा तिच्या सारखी दुसरी सुंदर गोष्ट जगात नाही असं मला कायम वाटत आलेलं आहे . कारण तो काळ तिला नव्याने उर्जावान बनवतो . मासिक पाळीच्या त्या चार- पाच दिवसातही तिला शारीरिक आणि मानसिक त्रास भोगावेच लागतात . पण म्हणतात ना 'घणाचे घाव बसल्याशिवाय कुठलाही आकार प्राप्त होत नाही ' हाच विचार स्त्री कायम करत आलेली आहे त्यामुळे ती सर्व त्रास सहन करत उर्जावान बनत असते. पण हीच उर्जावान स्त्री मात्र तिच्या संक्रमणाच्या काळात शारिरीक आणि मानसिक बदलांना सामोरी जाता जाता थकून जाते . तिच्या आतमध्ये होणारे बदल तिलाही पुरते समजत नाहीत. खरं म्हणजे तिला या काळात वैद्यकीय आधारासोबतच भावनिक, मानसिक आधाराची पण खूप गरज असते . पण कित्येक बायांना वैद्यकीय मदत मिळते . पण भावनिक आणि मानसिक आधार कुठेच मिळत नाही . आणि अजूनही काही काही स्त्रियांच्या वाट्याला वैद्यकीय मदत सुद्धा मिळत नाही . भावनिक आणि मानसिक आधार तर दूरची गोष्ट आहे. तरीही त्या या सगळ्या बदलाला तिला सामोरी जावंच लागतं. कारण ही नैसर्गिक गोष्ट टाळता न येणारी आहे . या संक्रमणाच्या काळात स्त्री पुरती खचते हे मी वरतीच सांगितलं आहे . तिच्यात या संक्रमणाच्या काळात तिच्या मध्ये असलेले स्त्री हार्मोन्स इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टरॉन सारखे बदलत राहतात . म्हणून तिचे मूड स्विन्ग्स होत राहतात . तिला मधेच थंडी वाजते तर मधेच गरमी होते . खरं म्हणजे हे सगळं तिच्या मनात सुरु असते. तिची सारखी चिडचिड , निगेटिव्हिटी, राग , संताप , ताप , सर्दी , bp वाढणे यासारख्या गोष्टींमधून जात असताना कधी एखादा मोठा रोग पुढ्यात येऊन ठेपेल हे सांगता येत नाही . हे स्त्री हार्मोन्स नेमके असे का वागतात हे खरं तर मोठं कोडंच आहे . पण शास्त्रीय दृष्ट्या आपण एक प्रकारचे संशोधन करून काही प्रमाणात उत्तर मिळवूच शकतो . तर बघूया पुढच्या लेखात हे स्त्री हार्मोन स्त्रियांचे शत्रू आहेत की मित्र ?वर्षा पतके थोटे ( शब्दाली )नागपूरvpatke 2606@gmail.com
० १ फेब्रुवारी २ ० २ ५
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
crossorigin="anonymous"></script>