पत्र वीस
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
इतकंच काय अश्रूवाटे कान्हाची प्रतिमा, आठवण वाहून जाऊ नये म्हणून तिने अश्रूनांही थारा दिला नसावा, जेणेकरून तिच्या ड़ोळ्यांनी अपराधी भाव जपून जगू नये. व्वा! वर्षा...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२०
ऐक ना!
तुला हे माहित्येय का, श्रीकृष्णाला सगळं जग महाज्ञानी, अत्यंत हुशार, वाकचातूर्यसंपन्न आणि द्वारकाधिश म्हणून ओळखतं असलं तरीरि राधेने आजन्म तिच्या कान्हावरचं प्रेम केलं. ख-या प्रेमात या सगळ्या उपाधीची गरज नाही रे भासतं. तेव्हाही नव्हती आणि आताही नाही. द्वारकाधिश होण्याच्या नादात प्रेम कुठेतरी वाटेतचं मागे राहून जातं. जसं कृष्णाचं कालिंदीच्या तटावर राहून गेलं. असं नव्हे की कृष्णाला ते आठवत नव्हतं पण पर्यायही नव्हता. जबाबदा-याच्या ओझ्यामूळे माणूस असो की देव फक्त रड़ण्याशिवाय पर्याय रहात नाही. जसा कृष्ण राधेच्या आठवणीत अश्रू ढाळायचा द्वारकाधिश झाल्यावर.
जीवनाचं गणित सूटलयं का कुणाला? खरंतरं कुणालाच नाही? एक तत्व धरून चालावं तर दुसरं कुठेतरी मागे सुटूनच जातं. जीवनाच्या धावपळीत आठवणी जपून ठेवाव्यात रे राधेसारख्या. खरं तर; तिने एक क्षणही कान्हाला आपल्या मनातून नजरेआड होऊ दिलं नाही. इतकंच काय अश्रूवाटे कान्हाची प्रतिमा, आठवण वाहून जाऊ नये म्हणून तिने अश्रूनांही थारा दिला नसावा, जेणेकरून तिच्या ड़ोळ्यांनी अपराधी भाव जपून जगू नये. किती हे प्रेम म्हणूनच पूर्ण गीतेत जरी कुठेही राधेचा संदर्भ येत नसला तरी गीतेचा समारोप मात्र राधेकृष्ण नावानेच होतो.
भक्त ही राधेप्रमाणे कान्हालाच जवळचा मानतात. द्वारकाधिश फक्त गीतेत शिल्लक राहीला. पण माणूस प्राणी मोठा स्वार्थी आपल्या सोयीनुसार कान्हाच्या व्यक्तिमत्वाला जवळ करत राहिला. पण तो हे पार विसरून गेला की द्वारकाधिश होण्याच्या नादात खूप काही हातातनं सुटून चाललयं. तरीही राधेच्या कान्हापेक्षा द्वारकाधिश होण्यासाठीच जगतोय. पण तू मात्र फार वेगळा राधेच्या कान्हाप्रमाणे ........म्हणूनच तर म्हणतेय अरे, मी तुला "विश्रब्ध"
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा