गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र ऐकोणवीस


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
May 2
आज सकाळी चुकून मंगळवारचे पत्र पुन्हा पोस्ट झाले आहे...आजचे पत्र...आत्ता पोस्ट करतो आहे.
क्षमस्व
विक्रम
नीरक्षीरविवेके ची उपमा अत्यंत चपखल बसली आहे.
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
१९
"हंस श्वेत: बक: श्वेत: , को भेद: बकहंसयो :।
नीरक्षीरविवेके तु हंसो हंस: बको बक :।।"
आता तू विचारशील की मधेच हा संस्कृत श्लोक का सांगीतलास? कारण सांगू ,कारssण या श्लोकातला हंस आणि तू, मला अगदी सारखे वाटता.
या श्लोकात असं म्हटलयं; हंस आणि बगळा दोघंही रंगाने, रूपाने अगदी एकसारखेच! इतके की, पाहिल्यावर वेगवेगळे ओळखूही यायचे नाहीत. पण मग दोघात फरक तो काय? का एकाला हंस म्हणायचं आणि का एकाला बगळा? तर हंसांच वेगळेपण त्याच्या अनोखेपणात दड़लयं. दूध आणि पाण्याच्या मिश्रणातलं फक्त दुध वेगळे करण्याची अनोखी कला फक्त हंसालाच जमते. याला निरक्षीरविवेक असं म्हणतात .
अगदी असाच विवेक तुझ्याठायी आहे..तुलाही जमलच की रे! म्हणजे बघ की, इतक्या अफाट विश्वातून तू मला अगदी त्या हंसासारखेच तर शोधलेस. मला शोधणं तसंही सोप्पयं का? आणि सापडू अशा ठिकाणी तरी कधी होतो का आपण? पण तरीही तू शोधलंसच ना मला?
आणि मग आपण दुध आणि साखर मिश्रणासारखे एक झालो. आपल्यातही तेवढाच गोडवा आला. कुणालाही आपलं वेगळेपण कधीच दिसायचं नाही. दिसला तर तो फक्त गोड़वाच दिसेल.
बघ आहे का त्या हंसात आणि माझ्या हंसात फरक. नाहीच मुळी!
या आधिच्या जन्मात नक्कीच तू हंस असशील म्हणूनच हे अनोखेपण तुला जपता आलंय . पण मी कोण असेन रे! मला नाही सांगता यायचं; पण हो तुझी जीवलग मात्र नक्कीच होते, म्हणून तर तू मला शोधू शकलास .
माहित्येय रे मला आताही मी तुझी जीवलगचं आहे, नव्हे, आता तर मी तुझा जीवचं जणू!
म्हणूनच तर मी तुला या जन्मीदेखिल नेहमी "विश्रब्ध" म्हणतेय.
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा