पत्र चोवीस
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
सुंदर पत्र आहे...आकाशपाळणा आणि प्रेम...व्वा!
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२४
तू कधी आकाश पाळण्यात बसलायसं का? ....हो ...हो, तोच जो जत्रेच्या ठिकाणी असतो. आजकाल तर शहराच्या ठिकाणी पण दिसायला लागलेत बघ!...
या आकाशपाळण्यात बसलं की, पाळणा वर गेल्यावर पोटात कसं गोलगोल विवर तयार होतं. आपला चेहरा घाबराघुबरा होतो आणि तोच पाळणा खाली आल्यावर कसली त्या खोलखोल विवरात गुदगुली व्हायला सुरूवात होते. मग क्षणातचं आपण हसायलाही लागतो. ज्याला कुणाला अभिनय येत नसेल त्याने या आकाशपाळण्यात जरूर बसावं. कसे क्षणार्धात चेह-याचे हावभाव बदलतात. पाहणा-यांना खूप मजा येते. जणू, आपण त्या क्षणाचे सर्वोत्तम कलाकारंच
आहोत की काय, असाच होत राहतो भास!
आहोत की काय, असाच होत राहतो भास!
बरं, मजेशीर गोष्ट अशी की ,हा पाळणा इतका जोरात असतो की वाटतं, हा कधी उखड़ेल काही सांगता ही यायचे नाही. शाळेच्या दिवसामध्ये वर्षातून एकदा तरी जत्रेत जाणं व्हायचं ...अरे, मला त्या आकाशपाळण्यात बसण्याचं कसलं ते अप्रुप...बरं आकाशपाळण्यात बसल्यावर मी नेहमी आकाशाकडेच पहायचे...आणि बाकीच्या मैत्रीणी खाली पहायच्या....त्यांच्यासाठी मित्र मैत्रिणी खालून ओरडत, वाट पहात रहायचे ते महत्वाचं होतं ........
पण मी कायम जगावेगळी....मला हे असलं तकलादू मित्रत्व कधी पटलचं नाही....हो... तकलादूच..अरे ते नं त्यांचं न कळत्या वयात आकर्षणापोटी झालेलं मित्रत्व, काही न कळण्याचंच वय ते !...
अर्थात सगळ्यांचंच नातं स्वार्थी असेल असेही नाही. पण मला मात्र कायम निरपेक्ष,अलौकिक असं सख्यत्व असलेली ही प्रतिमा तोवर तरी कुठं दुरुनही सापडली नव्हती. अरे, म्हणून मग मी नेहमी न भेटलेल्या तुला चक्क आकाशात शोधायचे....
हा आकाशपाळणा आणि प्रेम हे किती समातंर जाणारं आहे बघ, आपल्याला त्या आकाशपाळण्यात बसायचं तर असतं...पण त्यामध्ये जे हेलकावे येतात....ते मात्र नको असतात. अगदी तसचं प्रेमाचंही असचं असतं..मनात तयार झालेला तो विवर नकोसा असतो..पण त्यातली गुदगुली मात्र हवी हवी वाटते...
ती गुदगुली हवी असेल तर त्या उंच आकाशपाळण्यात स्वार व्हावचं लागेल. तो उंच आकाशपाळणा कधी उखड़ला गेला तर? ही भीती कायम सोबत घेवून खूप दूरवर चालावंही लागेल..तर आणि तरचं आपण त्या उंच उंच हिंदोळ्यावर हिंदोळत राहू.
पण मी मात्र नशिबवान आपण दोघंही सोबतीनेच तर बसलोय या उंच उंच हिंदोळ्यावर आताशा मी नाही आकाशाकडे बघतं .. आणि मी खाली ही नाही बघत.. आता फक्त आनंदाकड़े बघतेय मी...तुझ्या, नी समवेतच्या...!
तू कायम माझ्या मनाचा आनंदच तर जोपासत आला आहेस ..
उगीच नाहीच म्हणत रे मी तुला " #विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा