गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र अठरावे


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
April 30
हे अद्वैत आणखी काय असू शकते?
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र अठरावे
आताशा माझ्या मनातली जागा तुझ्या चेह-याने भरून टाकलीय... अरे! अशा वेळी किती ही ठरवलं तरी ही दुस-या कुठल्या विचारांना जागाच मिळत नाहिए. मग मी काय करावं बरं? यात दोष तुझाही नाही ..किंबहूना दोष कुणाचाच नाहीए. ही तर एक समाधी आहे. जी श्वासातून सोहssम ने सुरू होऊन ओंकारापर्यत जाऊन मनात स्थिरावते. या सगळ्या process मध्ये तुझा चेहरा, तुझे श्वास माझ्या श्वासात मिसळून अगदी एक होऊन जातात की नाही. मग हा दोष कसा असू शकेल बरं? हा तर त्या नियंत्यापर्यत पोहचण्याचा सुंदर असा मार्ग.
जो आपण दोघांनीही मिळून निवड़ला. पण तरीही हे मन खूप दुष्ट...यामध्ये कधी काळे ढग जमा होतात. तर कधी पांढरे. नेमका कोणत्या ढगांवर विश्वास ठेवावा हा कायम सतावणारा प्रश्न. बरं काळे ढग पावसाच्या स्वरूपात व्यक्त तरी होतात. पण पांढ-या ढगाचं तसंही नसतं. ते कायम आत्ममग्न स्वतःताच हरवलेले. हे जरी खरं असलं तरी दोघंही मनाच्या आकाशात दाटीवाटीने गर्दी करतात. मग एकमेकांची चढाओढ कोण पूढे जाणार? अशावेळी आकाशाला शांत रहाण्याशिवाय पर्याय उरत नाही.
पण आता हा प्रश्न माझ्या पूढे उरलाच नाहीए. तूझ्या अस्तित्वाने माझ्या मनाचं आकाश पार उजळलयं. तिथं मुंगी जाईल इतकीही जागा शिल्लक नाहीए. एव्हाना तुझ्याही मनात माझ्या चेह-याने जागा व्यापली असेलच.
हो...हो माहिती आहेच रे, मला मग उगीच का म्हणतेय मी तुला , "विश्रब्ध"
तुझीच,
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा