दुसरे पत्र
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
खरे आहे ...नियती नावाची बला खूप अवघड असते...अनघड असते...
विक्रम
विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
२
ऐक ना!
मला काहीतरी सांगायचे आहे. ऐकशील ना! ऐकशीलचं माहीती आहे मला. पण म्हणजे बघ कसे असते ना.....या जीवनप्रवाहात खूप काही मागे सुटते. हो ...हो अगदी सगळ्यांचेच. एकदा शांतपणे बसून भुतकाळ आठवून बघ आणि मग कळेल तुला की, मला काय म्हणायचे आहे. पूढेपूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी ही नियती नावाची बला मोठीच अवघड असते. एकदा का तिने मोठ्या धोंड्यासारखं नदी पात्रात आपले बस्तान मांडले की मग जसा नदीला प्रवाह बदलावा लागतो. अगदी तसेच काहीसे भल्याभल्याचेही होते. ..
मग मी तर एक सामान्य व्यक्ती आणि वरून स्त्री असल्याची जाणीव म्हणून जेजे पुढ्यात वाढले असेल ते ते गूपचाप स्विकारावे. हा धडा जरी नियतीने आणि संस्कृतीने शिकवला असला तरीही तो विसरणे हा ही गुणधर्म माणूस प्राण्याला उपजतच येतो. पण या सगळ्या गदारोळात जे हवे आहे, ते खूप मागे सुटून जाते हे मात्र नक्की.
पण तुला माहीती आहे का? तरीही माणसाने सतत प्रवाही राहणे हा निसर्ग नियमही पाळायलाच हवा. नाहीतर, "जो थांबला तो संपला", या उक्तिप्रमाणे अनपेक्षितपणे आपल्या मनातील गवाक्षाने जे आकाशस्थ चांणेणं आपल्या पदरात सहजपणे टाकले आहे ते ही वेचता आलेच नसते आणि त्या पदरातील चांदण्यांचेतेज मिरवत जीवनाचा चेहराही उजळायचा राहून गेला असता.
पण तरीही माणूस मोठाच लालची आहे. इतके सुंदर चांदणे ल्यालेला चेहरा मनसोक्त मिरवायचे सोडून आपला चेहरा त्या आपल्या कुणाला अजून दिसलाय की नाही? की तो पाहूनही सोयीस्करपणे नजर टाळलीय हे मात्र तो पटकन टिपतो आणि ती सल सतत उराशी बाळगतो.
पण मी म्हणते काय फरक पडणार असतो कूणी नाही पाहीलं तर? तसेही प्रत्येक जण नेमका अर्थ आपापल्या कुवतीनूसार लावत असतोच....पण तरीही आपल्याला उगाचच निश्चींत आणि आनंदी रहायचे असते, हो की नाही?
हा माझा चांदण ल्यालेला चेहरा आहे हे तुला कधी जाणवते का रे? ....मला विश्वास आहे हा चेहरा तुला दिसतो आणि तो पाहून तू नक्कीच सुखावत असशील!
तसेही तो चांदणं ल्यालेला चेहरा तुलाच दिसायला हवाय रे! मला माहीतेय तू ही चंद्रासारखा ...
उगीचं नाही म्हणत मी तुला विश्रब्ध. ..
तुझीच
- ©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा