तिसरे पत्र
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
स्वप्नांची किंमत....खरेच किती जणांना माहित असते? किती जण ती चुकवू शकतात?
विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
३
आज आकाश कसं अगदी निरभ्र आहे. दुधावरच्या शांत सायीप्रमाणे अंगावर शुभ्र चांदण्याची शाल ओढून पहुड़लं आहे. खेळूनखेळून दमलेलं लहान मूलं झोपावं तसा अवखळ वारा विसावला आहे. किंचितसा गारवा मात्र मनमोकळेपणाने सा-या माळरानावरून भिरभिरतो आहे. आणि त्याला साद घालीत आहे एक टिटवी भ्रमण करते आहे. एवढा टिटवीचा आवाज सोडला तर बाकी शांत...शांत आहे. दूरवर पसरलेलं हिरवं लुसलुशीत गवत माना ड़ोलवीत असलं म्हणून काय झालं. तेही शांतच आहे.
तळ्यातल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब उन्हात काच चमकावी तसेच चमकते आहे. मधूनच एखादा मासा ड़ुबकी मारून आपल्या अस्तित्वाची जाणिव करून देतोय. या अशा सुंदरशा चांदण्या रात्रीत आपण आपल्याच धुंदीत चालतो आहोत. दोघेही मौन, निःशब्द, असे नेमके कुठे निघालो आहोत हे ही माहित नाही. मधेच चालताचालता पाय कुठेतरी ठेचकाळून स्वप्नातील जगातून संवेदनांसह भानावर आल्यावरही या उलट-सुलट विचारांच्या चक्रात माझी मनस्थिती कित्येकदा भांबावल्या सारखी होते. अरे!
का? कोण जाणे पण तू मनापासून आवड़तोस. तसे पाहिले तर तुझ्या-माझ्यात दोन ध्रुवाचे अंतर. हे दोन ध्रुव एका रिंगणात फिरतात खरे, पण दिसत असतील खचीतचं आणि भेटण्याचा तर प्रश्नचं नाही. म्हणून उगीचचं स्वप्नांच्या मागे लागलो आहोत असं अधेमधे वाटतं रहातं.....पण आपण तिथेचं तर भेटलोय. हे विसरलास जणू!.......
स्वप्नांची किंमत तृणपात्यावरिल दवाच्या थेबांला विचारावी रे! आणि मगचं आपण स्वप्न पाहावीत आणि जगून घ्यावं त्या स्वप्नातचं.....न जगलेला क्षण अन् क्षण. तसही तुला नाहीचं कळणार स्वप्नांची किमंत, त्यासाठी निर्माल्य व्हावं लागतं. पण हे शक्य होईल का? कारण तुझा जन्मचं मुळी फुलांच्या वंशावळीत झालाच नाही ना! मग कसं बरं जमायचं तुला निर्माल्य व्हायला? अर्थात हा दोष तुझा नव्हेचं .....पण तरिही ठरवलं की बदलता येतचं.....
बघ बदलून कधितरी जमलं तर!
बघ बदलून कधितरी जमलं तर!
कधीकधी वाटतं मनातिल या दुहेरी वादळात मी एकटीच भरकटतेय कदाचित....मग अशावेळी स्वःताशीच ठरवते की आपण दूर कुठेतरी निघून जावं. अगदी कोशातून सुरवंटाने उड़ावे त्याप्रमाणे, पण मग लगेच दुस-या क्षणाला माझे मनोरथ जागच्या जागी विरून जातात. काठावर बांधलेल्या वाळूच्या किल्ल्यांसारखे आणि मग मी दुस-या दिवसाची वाट उरलेली स्वप्न बघतचं काढते.
पून्हा एकदा निर्माल्य होऊन!
माझ्यासाठी,
तुला जमेल का? फुलांच्या वंशावळित जन्म घेऊन निर्माल्य व्हायला!
हो....जमेलचं!.... अरे!, मग उगीचचं म्हणतेय, की, काय तुला मी विश्रब्ध.
तुझीच
.©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा