गुरुवार, ६ जून, २०१९

आठवे पत्र


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
March 28
वाचा आणि विचार करा....
विक्रम

#विश्रब्ध – वर्षा थोटे पतके

आज निवांत क्षणी "प्यार से प्यारा कोई नही, तेरे सिवा यारा मेरा कोई नही।" या गाण्याच्या काही ओळी कानावर पड़ल्या आणि मला लगेच जाणवले, अगदी खरेचं तर आहे.
प्रेम हा शब्दच मुळात किती प्रेमात पाड़णारा आहे ना? आहेच. पण समाजाची काकदृष्टी "प्रेम" या शब्दाला अशी काही गरगर फिरवते की मग वाटायला लागते की हे मृगजळ तर नसेल?
हो..हो ..मृगजळचं!
तुलाही चांगलंच ठाऊक आहे. या समाजाला स्त्री-पुरूषाच्या शुध्द मैत्रीची कल्पना करवत नाही. मग अशावेळी प्रत्येकाच्या मनात देव-दानवाचं युध्द सुरू असतं. तसेही माणसाचे पहिले प्रेम आधी स्वतःवर असते. स्वत:वर प्रेम करताकरता माणूस स्वत:च्या सुखदुःखाचा कायमचा होऊन जातो. मग अशावेळी त्याला दुस-याचं प्रेम मृगजळचं भासणार की नाही?
पण, तुला हे ही माहीती आहेच की, दुस-याच्या दुःखाची जाणीव ही दोन ह्रदयांना जोडणारी सर्वात जवळची वाट आहे. खरं तर प्रेम हे मिळाले तर वरदान आहे. अशा या प्रेमातल्या प्रेमळ शब्दाशब्दांची कळी मनात फुलल्यानंतर त्या सुंगधाने मन अधिकाधिक धुंद होत जाते. ही धुंदी प्रेमाची, समर्पणाची असते.
या प्रेमाच्या समर्पणात प्रेम करणारा काठावर सुरक्षित राहतो. तर प्रेमात पड़णारा भावनेच्या पूरात वाहत जातो...हो म्हणजे, बघ कसे असते. प्रेमात पड़णा-या मनाची भूक वाढत जाते. नाना प्रकारचे मोह घेराव घालतात. ते सारे टाळून पूढे जाणे हे माणसाच्या दृष्टीने काही सोपे काम नाही. पण प्रेम करणा-याचे तसे नसते. त्याला कुठल्याही मोहाने कवटाळलेले नसते....तो फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेम करत असतो. कुठलीही अपेक्षा न ठेवता...यात खरंतर खूप धुसरशी रेषा आहे. या दोन शब्दांमध्ये प्रेम करणे आणि प्रेमात पड़णे. ज्यांना या धुसर रेषेची ओळख झाली. तो तरला नाहीतर पार बुड़ाला.
कृष्ण तर मीरेला कधी दिसलाही नाही. तरीही मीरा प्रेमाच्या स्वप्न लहरी सुखद झुळूके प्रमाणे झेलत राहीली आणि तृप्त ..तृप्त होत गेली. हो की नाही.
अगदी तशीच आपणही मीरेसारखी स्वप्नलहरीतील सुखद झुळूक अंगावर घेवूयात.
हो.... हो मला माहीत्येय रे तुलाही अगदी मीरेसारखेचं स्वप्नलहरीत सुखद झुळूक अंगावर घ्यायला आवडते आणि मलाही!
म्हणून तर म्हणतेय ना मी तुला "
तुझीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा