गुरुवार, ६ जून, २०१९

चौथे पत्र


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
March 14
झाडांचा पुनर्जन्म....आवडली आहे संकल्पना...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्रं ४
ऐक ना,
बघ तुला माहीती आहे का मनाची शांतता जगातल्या त्रासदायक गोष्टींनी बिघड़ली की तेवढ्यापूरती तुझी मुर्ती दृष्टिआड़ होते?
मग अशावेळी ड़ोळे मिटून फोटोतल्या तुला मनाच्या जगात बिलगावं. आवेगाचं दुथडी भरुन वाहणारं खळाळतं पाणी दुधड़ी भरून वाहू द्यावं. अशा अंतर्प्रवाहातल्या काठोकाठ भरलेल्या वाहत्या पाण्यातचं तर आयुष्य वाहून चाललंय. जसं पाण्याला मागे वळता येत नाही. तसचं आयुष्यालाही नाही.
बघ ना! किती किती छान झालं असतं ना, जर आयुष्याला मागे वळविता आलं असतं तर? विझलेले आतले निखारे आणि एकाकीपण, पोखरलं नसतं मन तुझं, माझं आणि प्रत्येकाचंच ....हो की नाही? तुला माहित्येय का मला न कधी कधी या वसुंधरेचा फार फार हेवा वाटतो? तिला कसं पुन्हापुन्हा नव्याने अंकुरण्याचे वरदान मिळालं आहे! तसे आपल्याला का नाही मिळालं रे? जे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने आपल्याला जगता आले असते तर किती छान झाले असते ना? मग कुणीच अतृप्तपणे जगले नसते आणि कदाचित मृत्यू ही सहजतेने स्विकारला असता.
एकाच जन्मी शतदा पूर्नजन्म जणू!...
झाड़ांना कसं वरदान आहे. एकाच जन्मी पूर्नजन्माचं! म्हणजे बघ जुनी पानं जाऊन नवी पालवी फुटते. नवीन चैतन्य, नव्या जगण्याची आस, नवीन जन्माचा सोहळाच तो जणू! आणि या सोहळ्याच्या तृप्ततेतूनच नकळत दुस-यांना शांत मनाने सर्वस्व देण्याची वृत्ती आपोआप साधली जाते.
पण माणसांच्या नशीबात या सोहळ्याचे सुख नाहींचं. असतं तरी माणसाने ते शांततेने स्विकारलेलं असते का?...असो
हा वेगळाचं प्रश्न असला तरी मला मात्र कायम वाटतं रहाते की, आपल्यालाही झाड़ासारखी नवी पालवी, नवी स्वप्ने, नवी नाती मिळाली असती तर..?
खूप आवड़लं असतंच रे!
पण तू मात्र मला प्रत्येकजन्मी तूच हवास!
भेटशील ना!
नक्कीच भेटशील !
उगीचचं नाही म्हणतं रे मी तुला, "विश्रब्ध"
तुझीच ,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा