गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र अकरावे


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
April 9
आपण का जगतो ह्याचे कारण कळणे आणि मग त्या कारणाशी निष्ठा राखणे हे खूप महत्वाचे असते. आयुष्यात प्रत्येक गोष्टीची किंमत चुकती करावीच लागते.
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा थोटे पतके
११
जीवनात या समझदारपणाच्या ओझ्यामूळं जगणं सुटलंय की जगताचं आलं नाही. हा भयंकर छळणारा प्रश्न इच्छा नसूनही सोबत करतो. अगदी सगळ्याचींच सोबत करतो..... हो की नाही? माहित नाही कशाला हे न पेलवणारं ओझं आपण कायम सोबत घेवून जगतो अरे! जसं जमेल तसं जगावं. हो पण धूंदीत मात्र नक्की जगावं. मग ती धुंदी कुठलीही असु देत. संगीताची असो, कामाची असो, खेळाची असो, पुस्तकाची असो, लिखाणाची असो इतकंच काय मग ती प्रेमाची असली तरीही म्हणजे मनुष्य सुखानं जगू शकतो.
आपणही धुंदीतच आहोत की रे! किती सुखाने जगतो आहोत. सोबत पुस्तकांचं जग ही एक वेगळीच धुंदी. या धुदींमूळे एक मात्र नक्की! आपल्या खांद्यावर असलेलं ओझं आपल्याला जाणवतं ही नाही आणि दिसतहीहि नाही. जर का चुकून दिसलंच तर अनोळखी पण कायम राहतं. मग अशावेळी मन म्हणत असतं जगात सर्वात सुखी आपणचं जणू!
ही धुंदी आपण कायमच जोपासू या!
मला माहिती आहेच रे! तुला आवड़तचं धुंदीत रहायला आणि मलाही
उगीच म्हणतचं नाही. मी तुला "विश्रब्ध"
तुझीच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा