पत्र सतरावे
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
हे पत्र विचार करण्यासारखे...मन आणि शरीर...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र सतरावे
आज तुला एक गुपीत सांगु का, सांगतेच! ऐक! आम्हा बायकांच कसं असतं, अरे आधीधिच आम्ही भावनाप्रधान आणि हळव्या. त्यातही मातृत्वाचं वरदान आमचेकड़े! म्हणजेचं अतिशय संवेदनशिल आणि प्रेमळ मन. मग अशावेळी आम्हालाही आमचं मन जाणणारा आपला असं कोणतं तरी सख्य हवं वाटत असतं ..
तसंही आम्हां स्त्रियांना शरीरावर नव्हे मनावर राज्य करणारा पुरूष हवा असतो. पण खरं सांगू, तो प्रत्येकीलाच मिळतो असेही नाही. नाहीतर पांचाली पाच पुरूषांची पत्नी असूनही तीने कृष्णामध्ये आपले भावतरंग शोधले नसते...
मला तर नेहमी वाटतं आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या युगात राधाच नशीबवान! जिला तीच्या मनावर प्रेम करणारा मित्र मिळाला. यावरून तुला कळलेच असेल की तिच्या मनावर राज्य करणारा पुरूष तिच्यासाठी तोच पूर्ण पुरूष. तोच तिचा देव, ईश्वर, अल्ला, जिजस. ज्या स्त्रीला पूर्ण पुरूष मिळाला ती अशी माझ्यासारखी क्वचीत एखादी नशीबवान !!
हो....हो माझ्यासारखीचं! तू ही माझ्या मनाला माझ्याही नकळत कधी काबीज केलंस, हे तर मला कळलंही नाही. कुणाचं मन काबीज करणं इतकं का सोप्प असतं? एकदाची एखादी, अंत लढाई जिंकली जाईल. पण दुस-याच्या मनावर अधिराज्य गाजवणे. हे फक्त आणि फक्त प्रेमाने पूर्ण व्यक्तीच करू शकतो. अगदी तसाच तू ही आहेस.
प्रत्येकालाच असा प्रेमार्त मिळाला तर किती बरे होईल नाही. या पृथ्वीवर नंदनवनच जणू! पण म्हणतातना एखाद्या गोष्टीची उणीव असल्याशिवाय त्या गोष्टीचं महत्वही कळतं नाही. अगदी त्याच प्रमाणे प्रेमाचंही तसचं. पण आपण मात्र जन्मोजन्मी भेटत राहुयात. एकदा भेट व्हायला हवी खूणा आपोआप जुळल्या जातात अरे! या जन्मात नाही का जुळल्या...हो मला माहिती आहेच रे की तुलाही जन्मोजन्मी मला भेटायचंय आणि मलाही.
मग
उगीच म्हणते का मी तुला "विश्रब्ध"
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा