पत्र सोळावे
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
प्रेम ... ह्या शब्दात अध्यात्म आहे...हे बऱ्याचदा विसरले जाते...प्रेमाचे ठराविक अर्थ...डोक्यात रहातात. प्रेम हे कोणाबद्दलही वाटू शकते...ते निसर्गाबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, प्राण्याबद्दल, एका आठवणीबद्दल, फार कशाला जगाबद्दल वाटू शकते..वाटायला हवे.
विक्रम
पत्र सोळावे
प्रेम ही भावनाच किती प्रेमळ आहे ना. ही भावना घेउनच प्रत्येक जीव जगतो. हो जीवचं अरे! ज्याच्या मध्ये जीवंतपणा आहे तो प्रत्येकचं जण. मग ती झाड़े, पशू, प्राणी अगदी कुणिही...
प्रेम या तत्वावर कित्येक साहित्यकांनी लिहिलयं, संतमहतांनी लिहिलंय, तत्वज्ञांनी भाष्य केलंय. मग तरिही मागे प्रश्न उरतोच अरे! इतक्या सुंदर भावनेची काळी बाजूचं समाजात का रूजलीय? तुला पण पड़ला ना हा प्रश्न. पण याचं उत्तर अजूनपर्यत काही कुणाच्या हाती लागलं नाही. असो....मग आपण तरी का विचार करायचा?
खरंतरं प्रेमाची भूक ही माणसाला जन्मापासून ते अखेरपर्यंत असते. ह्रद्याची पहिली भुक ती प्रेमाचीच. हेच ह्रद्य शरीराला जसं शुध्द रक्त पुरवठा करतं. तसचं आत्म्याला प्रेम पुरवतं. जीवनाचा आरंभ ही प्रेम आणि मागे उरतं तेही प्रेम.
ओशो म्हणतात "प्रेम ही परमात्मा के निकटतम है"। आयुष्यात एखाद्या जरी व्यक्तिवर तुम्ही स्वःताला विसरून प्रेम केलं तर तुम्ही ईश्वराला प्राप्त केल्यासारखंच. नव्हे प्रेम म्हणजेच ईश्वर. मग आपणही या ईश्वराला साक्षी ठेवूनच जगतोय.
तुलाही माहिती आहेच. खरंतरं या तत्वानेच आपल्या दोघांनाही आपली स्वत:ची ओळख झालीय. वर्षानूवर्षे हरवलेली आपल्या अंतरंगातली खूण पटली आणि आपण आनंदी होऊन गेलो. आपल्या आयुष्यात आलेला हा क्षण जीवनाचं सार्थक करून गेलाय. जेवढं जमेल तेवढं जपूयात रे एकमेकांना.
मला माहित्ये रे तुलाही माझा होऊन जगायचयं आणि मलाही तुझी होऊन.
मग
उगीचचं म्हणते का मी तुला "विश्रब्ध"?
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा