गुरुवार, ६ जून, २०१९

पत्र पंधरावे


न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
April 18
मला गीत आठवले “या चिमण्यानो...परत फिरारे...घराकडे अपुल्या...जाहल्या तिन्हीसांजा...”
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पंधरावे पत्र
ऐक ना!
आपण आज गोधन घरी येतांनाच्र्या वेळेत नदीकाठी जाऊयात ना रे! मला खूप आवडतं काठावर बसून पाण्यात पाय सोडून बसायला. नेमकं त्याचं वेळी जंगलातून गोधन घराच्या ओढीने नदीकाठची धूळ उडवत घरी परतत असतं. किती सुंदर दृश्य असतं ना ते! एखादं गायीचं वासरू मागे राहून गेलंआणि गायीला दिसत नसेल तर किती जिवाच्या आंकाताने ओरडते ती गाय. आणि ते नटखट वासरू दुड़ूदुड़ू हसत हसत धावत येऊन तिला बिलगतं. ती गाय ही त्याला किती प्रेमाने चाटायला लागते. किती निस्वार्थ प्रेम असतं ना हे? आणि आपण वेड्यासारखे हे दृश्य पहात असतांनाच आपल्याकड़ेही ती गाय प्रेमळ नजरेने पहाते.
अगदी तसचं या पाण्यातील छोट्या छोट्या मासोळ्या माझ्या पायाला येवून बिलगतात आणि गुदगुली करून जातात. जशी काही माझी अन् त्यांची जन्मोजन्मीची मैत्री आहे.
बरं नुसतंच गुदगुली करत नाहित. त्या आपल्या पायाला जे काही ड़ेड़ मास असत ते खाऊन आपल्या पायाला एकप्रकारची मसाजही करत असतात. आपण आतमधून शांत शांत होत जातो. शास्त्र वगैरे असतं की नाही. माहिती नाही पण प्रेम नक्कीच असतं. किती निस्वार्थ पणे करत असतात सगळ हे. पण आपण माणसांनी त्यांच्या निस्वार्थीपणाचाही फायदा घेवून याला कुठल्याशा थेरपीचं नाव देऊन पैसे कमवणे सुरू केले. पण ह्या भांड़्यातल्या मासोळ्या तेवढ्याचं आत्मियतेने करत असतील का रे पायाला गुदगुली....आपल्या नदीतील मासोळ्या प्रमाणे आपली तर त्यांच्याशी जन्मोजन्मीची मैत्री आहे........
कदाचीत ?
प्राणी असले म्हणून काय झाले त्यांनाही आपलं माणूस त्याचं निस्वार्थ प्रेम कळतचं की, आताशा माझ्यासोबत तुलाही पाण्यात पाय सोडून बसायला आवड़ायला लागलं की, त्याही तुला माझ्याइतक्याचं ओळखायला लागल्यात. त्यांनी तुझ्या पायाला गुदगुली केली की कसला गोड हसून ओरड़तोस ना तू आणि मी मनसोक्त हसत सुटते. बरं तुझं प्रेमाने ओरडणं आणि माझं मनसोक्त हसणं त्यांनाही एवढं आवडतं, त्या danceकरताहेत की काय? असाच जणू भास व्हायला लागतो. त्या पण माझ्याप्रमाणेच तुझ्यावर विश्वास ठेवायला लागल्याहेत. तू ही त्यांच्यावर सुध्दा निस्वार्थपणे प्रेम करायला लागलायेस. मला माहिती होतंच रे तुला पण माझ्या या जीवलग माझ्याएवढ्याच आवडतील आणि तुही त्यांच्या प्रेमात पड़शील. पड़लाच की!
उगीच नाहीच म्हणत रे मी तुला "विश्रब्ध"
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा