पत्र चौदावे
न लिहिलेली पत्रे-Unwritten Letters
शब्दांचा गोंगाट ही बऱ्याच लेखकांची समस्या असते. अर्थपूर्ण शब्द सहज हाताशी लागणे हे एक आव्हान असते...
विक्रम
#विश्रब्ध – वर्षा पतके थोटे
पत्र चौदावे
तुला आठवतं का रे! कुठे भेटलोय आपण.....हो...हो तेच...आपण एकमेकांना शब्दातूनच तर भेटलोय....किती जगावेगळं न सगळचं?....आणि मग मला या जगावेगळ्या भेटीवर एक छानशी कविताही सुचली.....बघ वाच ही कविता..आवड़ेलच तुला. कवितेचं नाव पण कुणालाही आवडावं असचं.
"मनातला"
शब्दातून उतरलास तू माझ्या मनात
शब्दांची ताकद तुझ्या विचारातून लिखाणात येतेच.
शब्दांची ताकद तुझ्या विचारातून लिखाणात येतेच.
हे माहिती होतं तुला पहिल्यापासूनच
तू तुझा पुरूषी स्वभाव बाजूला सारून
खोल मनाच्या गाभ्यात तुझ्या शब्दांनी
कधी प्रवेश केला, तुला कळलं ही नसेल कदाचित,
तू तुझा पुरूषी स्वभाव बाजूला सारून
खोल मनाच्या गाभ्यात तुझ्या शब्दांनी
कधी प्रवेश केला, तुला कळलं ही नसेल कदाचित,
तू शब्दातून दिलेल्या स्वप्नांच्या मोरपिसांना
कवटाळून जगण्याचे संदर्भ शोधतेय मी
कवटाळून जगण्याचे संदर्भ शोधतेय मी
तुझ्या शब्दातून माझं अस्तित्व कण अन् कण
प्रेमाने काठोकाठ भरायचा प्रयत्न करतोय.
प्रेमाने काठोकाठ भरायचा प्रयत्न करतोय.
तुझ्या शब्दांना कळली तहान माझ्या
अतृप्त मनाची, मनावरील ओरखड़्याची
तसेच हे ही कळले, कशी असते स्त्री प्रेमार्ताची
अतृप्त मनाची, मनावरील ओरखड़्याची
तसेच हे ही कळले, कशी असते स्त्री प्रेमार्ताची
तुझ्या शब्दातून तू समजून घेतोस, सावरून घेतोस
कधि न पूर्ण होणा-या स्वप्नासाठीही तू आपल्या शब्दातूनच काळजाचं घर करतोस.
कधि न पूर्ण होणा-या स्वप्नासाठीही तू आपल्या शब्दातूनच काळजाचं घर करतोस.
कधी कधी शब्दातूनही पुरूष उलगडतो.
काय म्हणालास? इतक्यात संपली पण. हो अरे शब्दचं ते कधी कधी सापडता सापडत नाहीत. लहान मुले जसे बाजुलाच खेळून खेळून गोगांट घालतात ना? अगदी तसचं शब्दांचाही ड़ोक्यात गोंगाट सुरू असतो. मनात आलेले शब्द पटकन कूठेतरी लिहून ठेवले तर बरे नाहितर हट्टी मुलाप्रमाणे गोगांट करून करून थकून झोपीही जातात. मग आठवू म्हटले तरी आठवत नाहीत. मग सगळचं विस्कटतं.
हो पण आपण जरी शब्दातून भेटलो असलो तरी यांच्या सारखं न विस्कटता कायम एकमेकांच्या मनावर लिहिलेले राहू. मग विस्कटण्याचा किंवा हरवण्याचा प्रश्नच नाही. हो...हो माहित्येय रे मला आपलं हरवणं किंवा विस्कटण तुलाही नाहीच आवडणार. म्हणूनच तर मी तुला "विश्रब्ध" म्हणतेय.
तुझीच
©वर्षा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा