मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

लोकसंस्कृती आणि लोकगीते -----फुगडी

लोकसंस्कृती आणि लोकगीते
================================

‘एका हाताची फुगडी, मामा घेतो लुगडी

लुगड्याला गोंडा, फुई भाऊ नवरा कायकोंडा फु'.

फुगडी हा खरंतर एक लोकसंस्कृतीचा भाग आहे. पण मी लहानपणापासून हा प्रकार एक खेळ म्हणून खेळली आहे. ना की नृत्याचा प्रकार म्हणून. खो -खो , लंगडी, विटी दांडू, लगोरी या सर्व खेळांसोबत फुगडी हा माझा अत्यंत आवडीचा खेळ होता. आजही आहे. मला आजही फुगडी खेळायला आवडते. पण बाकी खेळांसारखा हा खेळ सुद्धा लुप्त होत चालला आहे. आता हा ना खेळ म्हणून शिल्लक आहे ना लोकसंस्कृतीचा एक भाग म्हणून अस्तित्वात आहे. या प्रकाराचं अस्तित्व सुद्धा फार सीमित झालं आहे. पंढरपूरला पंढरीचा राजा विठ्ठलाच दर्शन झाल्यावर फुगडी खेळण्याची प्रथा आहे. ही प्रथा असण्याचं सरळ साधं कारण म्हणजे पांडुरंगाचे दर्शन झाल्यामुळे जो अत्यानंद झाला आहे. तो फुगडी घालून व्यक्त केला जातो. वारक-यांचे तर आषाढीला पैदल वारीत जसं जसं पंढरपूर जवळ येतं तसं फुगडी घालण्याचं त्यांचं प्रमाण वाढत जातं. ज्यादिवशी रिंगण सोहळा असतो त्यादिवशी फुगडी ही घातलीच जाते. पण जुन्या काळात वऱ्हाडातील गावखेड्यात ही फुगडी खेळताना गाण्यातून कोट्या टाकल्या जात असत. कोट्या म्हणजे काय तर. मिश्कीलपणे एखादं गाणं म्हणणे. कोण्यातरी नात्याचा उल्लेख मिश्कीलपणे करणे. सर्वात जास्त उल्लेख कोणत्या नात्याचा होत असे तर. नवरा बायकोच्या नात्याचा, आतेभाऊ- मामेबहीण नात्याचा, साळी जावयाच्या नात्याचा, देर- भावजयीच्या नात्याचा. इत्यादी.

‘एका हाताची फुगडी, मामा घेतो लुगडी
लुगड्याला गोंडा, फुई भाऊ नवरा कायकोंडा फु.

या दोन ओळींमध्ये फुई भाऊ नवरा कानकोंडा फु. असं लिहिलं आहे. वऱ्हाडात आत्याला म्हणजे बाबाच्या बहिणीला फुई म्हणत असत. फुई भाऊ नवरा म्हणजे आत्याचा मुलगा हा एका अर्थी भाऊ पण लागतो आणि जर सोयरीक जुळली तर नवरा पण लागतो. आणि या संबंधाला सामाजिक मान्यता आहे. मामाची मुलगी आत्याच्या मुलाला बायको म्हणून करता येते. पण आत्याची मुलगी मामाच्या मुलाला बायको म्हणून करता येत नाही. कारण काय तर आत्याचा मान मोठा म्हणून तिला भावाची मुलगी सून म्हणून करण्याचा सामाजिक हक्क आहे. पण तोच हक्क मामाला नाही. आणि ही प्रथा अजूनही सुरु आहे. किती त्या धारणा आणि किती त्या गैर– समजुती होत्या, अजूनही काही धारणा, प्रथा आहेत हे खेदाने लिहावे लागते. तर फुगडी खेळताना फुई भाऊ नवरा कायकोंडा फु. म्हणजे काय तर. माझी फुगडी पाहून माझा आत्येभाऊ कायकोंडा होईल. म्हणजे लाजेने चुरचुर होऊन मान खाली घालेल. त्याला चिडवण्यासाठी म्हणून मी ही एका हाताची फुगडी खेळते आहे. मला माझ्या मामाने लुगडी म्हणजे नऊवार साडी घेतली आणि त्या नऊवार साडीच्या पदराला सुंदर सुंदर गोंडे आहेत. मला ती नऊवार फार आवडली आणि ते पदराचे गोंडे म्हणजे चमचमणारे चंद्र सूर्य आहेत जणू ! एवढी सुंदर नऊवार मामाने मला घेतली आणि मला ती नेसण्याचा मोह अनावर झाला आणि मी ती नेसली. ती नऊवार नेसल्यावर मी जणू एखाद्या अप्सरेसारखी सारखी माझी मलाच भासायला लागले. माझ्या मनाला झालेला आनंद लोकांना कळावा म्हणून मी फुगडी घालत सुटले आणि माझी फुगडी आणि माझे सौंदर्य बघून माझ्या आत्याचा मुलगा शरमेने लाजला बरं का ! असं ही या दोन ओळीतील नायिका म्हणत आहे. असा काहीसा तो भाव आहे. असं म्हणतात ‘ सामवेदाच्याही आधीपासून फुगडीची गाणी चालत आलेली आहेत. त्यांना पिढ्यांपिढ्यांचा वारसा आहे’ मौखिक साहित्याचा हा प्रकार नक्कीच आहे असं म्हटलं तरी योग्य होईल. जीवनात विनोद, मिश्कीलपणा, कोट्या, शब्दांचे लाडिक बाण ह्या सर्व गोष्टी प्रचलित होत्या. आणि हेच मनोरंजनाचे मुख्य स्रोत होते. पण आता या टेकनॉलॉजीच्या काळात हे सर्व लुप्त होत आहेत. किंबहुना झालेलेच आहेत. उत्तर प्रदेशमध्ये लग्नाच्या वेळेस व्याही विहीन एकमेकांना समोरासमोर बसून गाण्यातून कोट्या पाठवतात. त्या कोट्या मधून जो हास्यरस निर्माण होतो तो लग्न या प्रथेला बऱ्यापैकी सामाजिक सहजभावात बदलत नेतो. ही एक त्यांच्यामधील पारंपरिक प्रथा आहे. अजूनही काही प्रमाणात सुरु आहे. पण आपण महाराष्ट्रीयन त्यातही विदर्भ , विदर्भातील वऱ्हाड आपल्या पारंपरिक, लोकसंस्कृती आनंद देणाऱ्या गोष्टी पूर्णपणे विसरला आहे. ही फार मोठी खंत वाटते. पुन्हा येतील का ते दिवस परत ? उत्तर माहिती आहे तरीही मन स्वतःलाच प्रश्न विचारत राहतं........

©वर्षा पतके थोटे

१५/मार्च /२०२४

May be a doodle of dancing

<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-5032057122896847"
     crossorigin="anonymous"></script>

See insights and ads
All reactions:
Veena Randive, Alka Mokashi and 123 others
39 comments
9 shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा