anvika माझी लहान मुलगी आहे. तिला काय किंवा मोठ्या मुलीला सानिका ला काय मी कुठलाच चित्रकलेचा क्लास लावला नाही. तरीही दोघीही खूप सुंदर चित्र काढतात . मलाही कधी कधी फार नवल वाटतं . जरी ही आनुवंशिकता असली तरी कसं बरं हे सगळं घडून येत असावं . माझ्या नवरोजीला त्यांच्या बाबांकडून हा वारसा मिळाला आणि माझ्या मुलींना त्यांच्या बाबांकडून हा वारसा मिळाला . हे जरी खरं असलं तरी कसं घडत असावं हे जनरेशन ते जनरेशन ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे . सायन्स म्हणत असेल की त्यात काय एवढे. हे सगळं DNAमुळे होते आहे. DNA सारखा असला की काही सवयी , स्वभाव , काही रोग एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफ़र होतात . हे जरी खरं असलं तरी हे कोण घडवून आणत असेल बरं ! आहे ना विचार करण्यासारखी गोष्ट. खाली दिलेले चित्र anvika ने काढलेत . खाली तिचा फोटो पण दिला आहे. जुन्या काळी ही म्हण प्रचलित होती " आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येईल " ही म्हण किती तंतोतंत लागू पडते नाही का ? यावरून लक्षात येते ते हे की ह्या म्हणी उगाच नाही पडल्यात . प्रत्येक परिस्थितीशी मेलजोळ खात ह्या म्हणी जुन्या लोकांच्या सुपीक डोक्यातून निघाल्या आहेत . तर अशी ही चित्रकला आमच्या घरात वारसा हक्काने आली आहे आणि माझ्या दोन्ही मुली कलाकार आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. जीवनात त्यांच्या हातून भरघोष कार्य नक्कीच होईल . आणि ही कला येणाऱ्या पिढी कडे पुन्हा ट्रान्सफर होईलच हा आशावाद आहेच . तूर्तास थांबते भेटू पुन्हा anvika च्या नवीन चित्रासह तो पर्यंत बाय
वर्षा पतके थोटे
anvika & सानिका ची आई



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा